Pranali Kodre
भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 स्पर्धेत सौराष्ट्रकडून झारखंडविरुद्ध पहिल्याच सामन्यात खेळताना द्विशतक केले.
पुजाराने 356 चेंडू 30 चौकारांसह 243 धावांची नाबाद खेळी केली.
पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 17 वे द्विशतक ठरले.
त्यामुळे पुजाराने हर्बर्ट सटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश यांची बरोबरी केली आहे. सटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश यांनीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 17 द्विशतके केली आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता पुजारा हर्बर्ट सटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 37 द्विशतकांसह ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन आहेत.
या विक्रमाच्या यादीत दुसर्या क्रमांकावर 36 द्विशतकांसह इंग्लंडचे वॅली हेमंड आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही इंग्लंडचेच पॅस्टी हंड्रेन आहेत. त्यांनी 22 प्रथम श्रेणी द्विशतके केली आहेत.