एकदाही न भेटता विराट-जोकोविच कसे बनले मित्र?

Pranali Kodre

लोकप्रिय खेळाडू

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि सार्बियाचा स्टार टेनिसपटू जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत.

Virat Kohli - Novak Djokovic | X

मैत्री

दरम्यान, हे दोघेही वेगवेगळा खेळ खेळत असले, तरी त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप ते एकमेकांना भेटलेही नाहीत.

Novak Djokovic | Twitter

एकमेकांबद्दल आदर

त्यांच्या मैत्रीबद्दल त्या दोघांनीच खुलासा केला आहे. तसेच त्या दोघांनीही सांगितले की ते एकमेकंनी मिळवलेल्या यशाबद्दल एकमेकांचे कौतुक करतात आणि आदरही करतात.

Novak Djokovic | AFP

मेसेजवर चर्चा

सोनी स्पोर्ट्सशी बोलताना जोकोविचने सांगितले होते की, 'विराट कोहली आणि मी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना मेसेज करतो. आम्हाला एकमेकांना अजून प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेली नाही.'

Virat Kohli | Twitter

पहिला मेसेज

यानंतर विराटने त्यांच्यात मैत्री कशी झाली याबद्दल बीसीसीआयशी बोलताना खुलासा केला. त्याने सांगितले की 'मी एकदा इंस्टाग्रामवर त्याचे प्रोफाईल पाहात होतो आणि मी सहज मेसेजचं बटण दाबलं, मला वाटतं मी हॅलो वैगरे म्हटलो असेल. नंतर माझ्या डीएमवर त्याचा मेसेज आला होता.'

Virat Kohli | X/ICC

अन् मैत्री झाली

तसेच विराटने असेही सांगितले की पहिल्यांदा जोकोविचचा मेसेज बघून त्याला ते खोटं अकाऊंट वैगरे असेल, असे वाटले होते, मात्र खरोखरंच जोकोविचने मेसेज केला होता. त्यानंतरच ते एकमेकांशी बोलायला लागले. तसेच आता बऱ्याचदा ते एकमेकांना मेसेज करतात.

Virat Kohli | BCCI

भेटण्याची आशा

त्याचबरोबर विराट असेही म्हणाला की 'आशा आहे जोकोविच लवकर भारतात येईल किंवा मी तो ज्या देशात खेळत असेल, तिथे जाईल. आम्ही नक्कीच भेटू आणि कदाचीत एखादा कप कॉफी वैगरे घेऊ.'

Virat Kohli | Instagram

टीम इंडियात इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी 3 विकेटकिपर

KS Bharat | X/BCCI
आणखी बघण्यासाठी