Pranali Kodre
इंग्लंडचा क्रिकेट संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारताविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 12 जानेवारी रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली.
या भारताच्या कसोटी संघात निवडण्यात आलेल्या 16 खेळाडूंमध्ये तिघांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे.
भारताच्या संघात केएल राहुल, केएस भरत आणि जितेश शर्मा यांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे. जितेशला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली आहे.
याशिवाय भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे, तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
याशिवाय भारतीय संघात विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर हे फलंदाजही आहेत.
याशिवाय आर अश्विन, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा हे फिरकी गोलंदाजीबरोबरच अष्टपैलू खेळाडू म्हणूनही कामगिरी बजावू शकतात. फिरकी गोलंदाजीमध्ये त्यांच्याबरोबर कुलदीप यादवही आहे.
वेगवान गोलंदाजी फळीत मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
भारत इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी 25 जानेवारीपासून हैदराबादला खेळणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला दुसरी कसोटी, 15 फेब्रुवारीपासून राजकोटला तिसरी कसोटी, 23 फेब्रुवारीपासून रांचीला चौथी कसोटी आणि 7 मार्चपासून धरमशालाला येथे पाचवी कसोटी सुरु होणार आहे.