Virat Kohli Retirement: क्रमांक 4 चा नवा वारसदार कोण? विराटच्या निवृत्तीनंतर 'हे' 3 स्टार चर्चेत

Sameer Amunekar

विराट कोहली

अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Virat Kohli Retirement | Dainik Gomantak

निवृत्तीची घोषणा

कोहली आता फक्त ५० षटकांच्या क्रिकेटमध्येच दिसणार आहे. ३६ वर्षीय कोहलीने गेल्या वर्षीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.

Virat Kohli Retirement | Dainik Gomantak

१२३ कसोटी सामने

विराटने भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकांसह ९२३० धावा केल्या.

Virat Kohli Retirement | Dainik Gomantak

कोणाला संधी मिळणार?

विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्याच्या जागी आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. विराट कोहलीची जागा घेऊ शकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

Virat Kohli Retirement | Dainik Gomantak

श्रेयस अय्यर

गेल्या काही महिन्यांपासून श्रेयस अय्यर एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने कसोटी सामन्यांमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्याला विराटच्या जागी संधी मिळू शकते.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

शुभमन गिल

गिल एका स्थानाने वर जाऊन चौथ्या क्रमांकावर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. फक्त क्रमांक १ आणि क्रमांक ३ दरम्यान फलंदाजी केली आहे, परंतु तो विपराटच्या जागी खेळू शकतो.

Shubman Gill | Dainik Gomantak

सरफराज खान

सरफराज खानही विराट कोहलीची गादी काबीज करू शकतो. सरफराजने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि दोन्ही डावात अर्धशकत केलं होतं.

Sarfaraz Khan | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा