Akshata Chhatre
अनेक दिवसांच्या अफवांनंतर अखेर विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
विराट कोहली हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेला फलंदाज आहे. त्याच्या आक्रमक शैलीने आणि सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने लाखो चाहते मिळवले.
"मी एकदा क्रिकेटमधून बाजूला झालो की, काही काळ मी कुठेही दिसणार नाही." हे त्याचे शब्द आता निवृत्तीनंतर खरे ठरत आहेत.
मी माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण ताकदीने खेळायचं ठरवलं आहे, असं विराट म्हणाला होता.
कोहलीने नेहमीच म्हटले की त्याला अपूर्णता नको आहे. प्रत्येक सामन्यात शंभर टक्के देण्यावर त्याचा भर होता.
क्रिकेटनंतर कोहली आता वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेण्याच्या तयारीत आहे. त्याने वेळोवेळी खासगी आयुष्याच्या महत्त्वावर भर दिला आहे.