Akshata Chhatre
जेव्हा देशात तणावाचं वातावरण असतं, तेव्हा सामान्य माणसांच्या मनात भीती, चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
बातम्यांमध्ये बॉम्ब, सैन्य, हल्ले, मृत्यू यांचं सतत कव्हरेज मनावर परिणाम करतं. ही भीती काही वेळा मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करते.
झोप न लागणे, भविष्याची चिंता, भीतीमुळे चिडचिड आणि अस्वस्थता, नकारात्मक विचार वाढणे या काही साहजिक गोष्टी आहेत.
अफवा, हिंसक फोटो आणि सतत अपडेट्स या गोष्टी चिंता वाढवतात. काही वेळेस 'डूम स्क्रोलिंग' मानसिक थकवा वाढवते.
विश्वासार्ह माहितीच पहा, काही वेळ तरी बातम्यांपासून दूर राहा, कुटुंबासोबत संवाद वाढव, चिंतेबद्दल बोलायला भीती बाळगू नका
युद्ध हा तणावाचा काळ असला तरीही यातून तोडगा काढणं शक्य आहे.