Manish Jadhav
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर आता 30 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची वनडे (ODI) मालिका सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अपेक्षेनुसार कामगिरी न करु शकलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.
विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये शानदार रेकॉर्ड आहे. त्याने 31 सामन्यांमध्ये 65.39 च्या सरासरीने 1504 धावा केल्या आहेत.
मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सध्या 435 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर राहुल द्रविडने 440 धावा केल्या आहेत.
या आगामी वनडे मालिकेत विराट कोहलीने फक्त 6 धावा केल्या, तर तो राहुल द्रविडला मागे टाकून मायदेशात आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये आतापर्यंत 5 शतके ठोकली आहेत आणि तो या बाबतीत सचिन तेंडुलकरसोबत (5 शतके) संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
या मालिकेत एक जरी शतक केले, तर विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके (6) करणारा एकमेव भारतीय फलंदाज बनून सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.