Manish Jadhav
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स (Wickets) घेण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 हून अधिक कसोटी बळी घेणारा तो आता भारताचा केवळ पाचवा गोलंदाज ठरला.
या विक्रमासह, अनिल कुंबळे (54), जवागल श्रीनाथ (64), हरभजन सिंग (60), आणि रवी अश्विन (57) यांसारख्या दिग्गजांच्या यादीत जडेजाने आपले नाव समाविष्ट केले.
जडेजाने भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे (39) आणि हरभजन सिंग (44) यांना मागे टाकले.
जडेजाने भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 कसोटी सामन्यांमध्ये 44 बळी घेतले.
मात्र, भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अजूनही आर. अश्विनच्या (46 बळी) नावावर आहे.