Manish Jadhav
गेल्या हंगामात केकेआरला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघ शानदार कामगिरी करत आहे.
पंजाब आता 15 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त एका विजयापासून दूर आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शानदार कामगिरी केल्यानंतर फॉर्म गमावलेला श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे.
श्रेयस आता या हंगामात सर्वाधिक वेळा 400 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. एवढेच नाहीतर त्याने वीरेंद्र सेहवागसह रोहित शर्माचा विक्रमही मोडला.
श्रेयस हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 400 पेक्षा जास्त धावा करणारा गौतम गंभीर, एमएस धोनी आणि केएल राहुल यांच्यासह संयुक्तपणे तिसरा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत विराट कोहली आघाडीवर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून 7 वेळा 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 400+ धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरने पाच वेळा हा पराक्रम केला आहे. तर, श्रेयस अय्यरने चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 400+ धावा करणारे कर्णधार पुढील प्रमाणे- 7 वेळा- विराट कोहली, 5 वेळा- डेव्हिड वॉर्नर, 4 वेळा- श्रेयस अय्यर* 4 वेळा- गौतम गंभीर
आयपीएल 2025 मध्ये श्रेयसने आतापर्यंत 11 सामन्यांच्या 11 डावात 50.62 च्या सरासरीने आणि 180.80 च्या शानदार स्ट्राईक रेटने एकूण 405 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने आतापर्यंत 27 चौकार आणि 27 षटकार मारले आहेत.