Manish Jadhav
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल 2025 च्या 37व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध आणखी एक अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
किंग कोहली सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला.
विराटच्या बॅटमधून हे शानदार अर्धशतक एका महत्त्वाच्या क्षणी आले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जने आरसीबीला 158 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना, फिल सॉल्ट पहिल्याच षटकात बाद झाला, मात्र त्यानंतर विराटने पडिक्कलसोबत शतकी भागीदारी करुन संघाला विजय मिळवून दिला.
आयपीएलमध्ये विराटचा हा 67 वा 50+ स्कोअर आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने हा पराक्रम 66 वेळा केला होता. आता विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाज- विराट कोहली- 67, डेव्हिड वॉर्नर- 66, शिखर धवन- 53, रोहित शर्मा- 45, केएल राहुल- 43
विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, हा त्याच्या कारकिर्दीतील 260 वा सामना आहे, त्याने आतापर्यंत 59 अर्धशतके आणि 8 शतके झळकावली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.
धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत विराटचा आयपीएल 2025 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर आता त्याने पंजाब किंग्जविरुद्धही अर्धशतक झळकावले आहे.