Shubman Gill: शुभमन गिल रचणार इतिहास; किंग कोहलीचा 'तो' मोठा रेकॉर्ड निशाण्यावर

Manish Jadhav

गिलकडे वनडे कर्णधारपद

बीसीसीआयने शुभमन गिलला (Shubman Gill) आता वनडे (ODI) क्रिकेटमध्येही भारतीय संघाचे कर्णधारपद दिले आहे. तो पहिल्यांदाच वनडेत नेतृत्व करेल.

Shubman Gill | Dainik Gomantak

कोहलीच्या विक्रमाशी बरोबरीची संधी

गिलकडे ऑस्ट्रेलियात होणारी वनडे मालिका जिंकून विराट कोहलीच्या (Virat Kohli) खास विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

40 वर्षांचा इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1980 पासून वनडे मालिका सुरु झाली, पण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आजपर्यंत केवळ एकदाच मालिका जिंकली आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

विराट कोहलीचा विक्रम

भारताने ऑस्ट्रेलियात एकमेव वनडे मालिका विजय 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवला होता.

Shubman Gill | Dainik Gomantak

कोहलीने मालिका कशी जिंकली?

तीन सामन्यांच्या त्या मालिकेत पहिला सामना हरल्यानंतर कोहलीच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत दुसरे (6 विकेट्सने) आणि तिसरे (7 विकेट्सने) सामने जिंकून मालिका ताब्यात घेतली होती. आता गिलकडे ही सुवर्णसंधी आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

कर्णधार म्हणून अनुभव

गिलने यापूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून काम केले आहे, पण वनडेत त्याचा हा पहिलाच अनुभव असेल.

Shubman Gill | Dainik Gomantak

कठीण सुरुवात

ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे हे गिलसाठी सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असेल, पण यशस्वी झाल्यास त्याच्या कर्णधारपदाची दमदार सुरुवात होईल.

Shubman Gill | Dainik Gomantak

लक्ष वेधले

आता गिल या मालिकेत विराट कोहलीने केलेला पराक्रम दुसऱ्यांदा करुन दाखवतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा जलवा कायम! दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा 'हा' खास पुरस्कार

आणखी बघा