Manish Jadhav
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला सप्टेंबर 2025 साठीचा आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झाला.
सप्टेंबरमधील दमदार कामगिरीसाठी मानधनाला पाकिस्तानच्या सिदरा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताझमीन ब्रिट्स यांच्यासह नामांकित करण्यात आले होते.
मानधनाने सप्टेंबर 2025 मध्ये खेळलेल्या 4 वनडे सामन्यांत 77 च्या शानदार सरासरीने 308 धावा केल्या.
या चार सामन्यांमध्ये मानधनाने 2 शतके आणि 1 अर्धशतकी खेळी केली, ज्यामुळे तिचा स्ट्राइक रेट 135.68 इतका प्रभावी होता.
मानधनाने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठित आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जिंकला आहे; यापूर्वी तिने जून 2024 मध्ये हा सन्मान मिळवला होता.
हा पुरस्कार जिंकल्यानंतर मानधनाने आनंद व्यक्त केला आणि अशा पुरस्कारांमुळे खेळाडूंना अधिक चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मानधना आता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक शतकांच्या बाबतीत मानधनाच्या पुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज मेग लॅनिंग आहे.