Akshata Chhatre
गोवा म्हटलं की फुटबॉलचं प्रेम आलंच. गोव्यात फुटबॉलचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे आणि याला कोणीही नाकारू शकत नाही.
गोव्यातील तरुण पिढीमध्ये खास करून फुटबॉलची क्रेज पाहायला मिळते.
गोवा आणि फुटबॉल म्हटलं म्हणजे एफसी गोवाचा संघ आलाच. हिरो इंडियन सुपर लीग या स्पर्धत अनेकांचा आवडता संघ.
मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेट आणि फुटबॉल यांचं एक वेगळंच कनेक्शन सांगणार आहोत.
गोव्यातील एफसी गोवा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांचं जवळचं नातं आहे. कसं? जाणून घ्या
23 सप्टेंबर 2014 पासून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली एफसी गोवा संघाच्या सह-मालकांपैकी एक आहे.
जयदेव मोदी (65%), अक्षय टंडन (23%) आणि विराट कोहली या तिघांमध्ये संघ विभागलेला आहे आणि पैकी विराट जवळ संघाचा 12 टक्के हिस्सा आहे.