Akshata Chhatre
गोव्यातील ओल्ड गोवा चर्च बद्दल तुम्ही अनेक जणांकडून ऐकून असालच मात्र आज आम्ही काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहिती नसतील.
ओल्ड गोव्याची चर्च ही ब्राऊन चर्च म्हणून ओळखली जाते आणि वर्षभर लाखो लोकं चर्चला भेट देतात.
ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव ठेवलेले आहे. सेंट झेवियर यांचे वर्ष 1552 मध्ये निधन झालं होतं आणि वर्ष 1624 मध्ये त्यांचं शव गोव्यात हलवण्यात आलं होतं.
वर्ष 1594 मध्ये या चर्चची बांधणी सुरु झाली आणि वर्ष 1605 मध्ये ही बांधणी पूर्ण झाली होती. सात अजूब्यांपैकी एक म्हणजेच ताज महालची बांधणी 1648 मध्ये झाली होती त्यामुळे ही चर्च ताज महालपेक्षा देखील जुनी आहे.
जुने गोवे किंवा ओल्ड गोवा ही कधी एकेकाळी गोव्याची राजधानी होती आणि तेव्हपासून ते आत्तापर्यंत ही चर्च तेवढ्याच दिमाखात उभी आहे.
राज्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याची लगबग सुरु आहे. येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या सोहळ्यासंबंधी कामे पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले आहे.