Akshata Chhatre
नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवत RCB ने पहिल्यांदाच IPL ट्रॉफी उंचावली. संपूर्ण संघासाठी आणि चाहतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला.
शेवटचा चेंडू टाकल्यानंतर कोहली गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते 18 वर्षांच्या वाटचालीचा परिपाक.
अनुष्का स्टँडमध्ये उभी राहून विराटसाठी ओरडत होती. विजयानंतर त्यांचं आलिंगन संपूर्ण देशासाठी प्रेम आणि गर्वाचा क्षण ठरला.
"प्रोफेशनल खेळाडू म्हणून मी जे अनुभवतो, ते तीही शांतपणे सहन करत आलीय," असं विराटने सांगितलं.
या वर्षी कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, टेस्टमधून निवृत्त झाला आणि IPL ट्रॉफीने या प्रवासाला शिखर गाठलं.