Akshata Chhatre
प्रेमाला वयाची मर्यादा नसावी, जन्माचे बंधन नसावे, जेव्हा कोणी प्रेम करते तेव्हा त्याने फक्त हृदयाकडे पहावे.
प्रेम हे वय, जात, परिस्थिती याच्या पलीकडचं असतं कारण प्रेम डोळ्यांनी नव्हे, तर हृदयाने केलं जातं आणि खरंच, प्रेम कोणत्याही वयात, कोणासोबतही होऊ शकतं.
जेव्हा लग्नाचा विचार केला जातो, तेव्हा मात्र वास्तव वेगळं असतं इथे वय महत्त्वाचं ठरतं.
विज्ञानाच्या मते, मुली लवकर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रौढ होतात. हार्मोनल बदल आणि मेंदूच्या वाढीच्या अभ्यासावरून हे स्पष्ट झालं आहे.
कायद्यानंही मुलींसाठी वय १८, आणि मुलांसाठी २१ अशी वेगळी मर्यादा ठरवलेली आहे.
नात्याचं यश केवळ वयावर अवलंबून नसतं. समान मूल्यं, आदर, संवाद, आणि भावनिक समज हेच नातं टिकवतात.