Manish Jadhav
आयपीएल 2025 चा फायनलचा थरार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे.
दरम्यान, या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी केली. सलामीवीर विराट कोहलीने इतिहास रचला. किंग कोहलीने 1 चौकार मारुन हा इतिहास रचला.
विराटने पंजाबविरुद्ध चौकार मारताच इतिहास रचला. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम असलेल्या शिखर धवनला मागे सोडले.
आयपीएलमध्ये आता विराटने 769 चौकार मारले. दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून 768 चौकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 663 चौकार मारले. रोहित शर्मा 640 चौकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
पंजाब किंग्जविरुद्धच्या फायनल सामन्यात विराटने फिल सॉल्टच्या मदतीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
आरसीबी आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आयपीएलचा पहिला किताब जिंकण्यासाठी निकराची लढाई लढत आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही संघाला 18 वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे.