Sameer Panditrao
दक्षिणेत सुभेदार असताना औरंगजेब बीदर, कल्याणी भागात विजापूरकरांशी लढत होता. तिकडे त्याने धुमाकूळ घातला होता.
औरंगजेबाला रोखायला खान महंमद या सरसेनापतीच्या नेतृत्वाखाली फौज रवाना झाली. त्यात अफजलखान होता.
या आदिलशाही सेनेने औरंगजेबाला गाठले. प्रचंड युद्ध सुरु झाले.
अफजलखानाने शौर्याची कमाल केली. औरंगजेबच्या पलटणीला जबरी फटका बसला.
परिस्थिती अशी आली होती की औरंगजेब अफजलखानाच्या हातून ठार होईल.
धूर्त औरंगजेबाने आदिलशाही सरसेनापती खान महंमदशी बोलणे करून स्वतःची सुटका करून घेतली आणि निघून गेला.
अफजलखान प्रचंड संतापला. पुढे त्याने बडी बेगमच्या कानावर हा प्रकार घालून खान महंमदची हत्या घडवून आणली.