Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यासाठी स्टेडियमवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.
या सामन्यात विराट कोहलीने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. दरम्यान, तो 88 धावांवर बाद झाल्याने त्याची सचिन तेंडुलकरच्या ४९ व्या वनडे शतकाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी थोडक्यात हुकली.
मात्र, असे असले तरी विराटने सचिन समोरच त्याचा 16 वर्षांपूर्वीचा एक मोठा विक्रम मोडला.
विराटने या खेळीदरम्यान 2023 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात वनडेत 1000 धावा पूर्ण करण्याची ही आठवी वेळ ठरली.
त्यामुळे तो 8 वेळा एका वर्षात 1000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याबाबत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सचिनने 1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003, 2007 अशी 7 वर्षे वनडेत एका वर्षात 1000 धावांचा टप्पा पार केला होता.
विराटने 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2023 असे आठ वर्षी वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.