Virat Kohli: किंग किंग असतो! विराट बनला 9000 हजारी मनसबदार

Manish Jadhav

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

आयपीएल 2025 मधील शेवटच्या लीग स्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ने त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला सहा विकेट्सने पराभूत केले.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट कोहली

स्टार फलंदाज विराट कोहलीने संघाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत 54 धावांची तूफानी खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर विराटने या हंगामात 600 धावांचा टप्पाही गाठला.

Virat Kohli | Dainik Gomantak

पाचव्यांदा पराक्रम

विराटने पाचव्यांदा हा पराक्रम केला. या हंगामात त्याने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 602 धावा केल्या, ज्यामध्ये आठ अर्धशतकांचा समावेश आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

पहिला खेळाडू ठरला

लखनौविरुद्धच्या त्याच्या शानदार खेळीदरम्यान विराटने आरसीबीसाठी 9000 धावाही पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

Virat Kohli | Dainik Gomantak

600+ धावा

आयपीएल 2025 हा विराट कोहलीचा सलग तिसरा हंगाम असेल, ज्यामध्ये त्याने 600 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटबरोबर आणखी कोण?

विराटबरोबर ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनीही सलग तीन हंगामात 600+धावा करण्याची कामगिरी केली आहे. कोहलीप्रमाणेच गेलनेही आरसीबीसाठी हा विक्रम केला आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघा