Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 4 जानेवारी 2024 रोजी संपली.
या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर पार पडला, ज्यात भारताने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी 2023 रोजी 7 विकेट्सने विजय मिळवला.
त्यामुळे भारताचा केपटाऊनमधील हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच विजय ठरला आहे.
इतकेच नाही, तर भारतीय संघ केपटाऊनमध्ये कसोटी विजय मिळवणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. यापूर्वी आशियातील कोणत्याच संघाला केपटाऊनमध्ये कसोटी विजय मिळवता आला नव्हता.
यापूर्वी भारताने 1993 पासून म्हणजेच गेल्या 31 वर्षात केपटाऊनला 6 कसोटी सामने खेळले होते. त्यातील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 4 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवले आहेत.
साल 1997, 2007, 2018 आणि 2022 या चार वर्षी केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यांत भारताने पराभव स्विकारला. तसेच 1993 आणि 2011 साली केपटाऊन कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश मिळाले. विशेष म्हणजे भारताने हे सर्व सामने जानेवारी महिन्यात खेळले आहेत.
दरम्यान, भारताने 4 जानेवारी 2024 रोजी केपटाऊन कसोटी जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याची भारताची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2010-11 साली झालेल्या कसोटी मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली होती.