Manish Jadhav
विराट कोहलीसाठी 2024 वर्ष सर्वात वाईट ठरलं. 2024 मध्ये त्याने फक्त एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. विराटने 19 सामने खेळले ज्यामध्ये त्याने केवळ 417 धावा केल्या. त्याची सरासरी 24.52 एवढी राहीली.
विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील 2024 हे सर्वात वाईट वर्ष ठरले. यापूर्वी, 2020 मध्ये विराटने 842 धावा केल्या होत्या.
2024 मध्ये विराट कसोटी, वनडे आणि टी-20 असे एकूण 23 सामने खेळला. यात त्याने 21.83 च्या सरासरीने 655 धावा केल्या.
विराटने 30 जून 2011 रोजी भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 7 द्विशतके आहेत.
विराटने कसोटीत122 सामन्यांत 47.21 च्या सरासरीने 9207 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे तर नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
विराटने आतापर्यंत 295 वन डे सामन्यांत 58.18 च्या सरासरीने 13906 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 50 शतके आणि 72 अर्धशतके झळकावली आहेत.
त्याने 14 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 125 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या. यामध्ये 38 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे.