Manish Jadhav
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी व्हिनफास्टने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. लवकरच व्हिनफास्टच्या VF6 आणि VF7 भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.
या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी प्रतीक्षा आता संपली आहे. व्हिनफास्टने अधिकृतपणे घोषणा केली की, या गाड्या 6 सप्टेंबर 2025 रोजी लॉन्च होतील.
व्हिनफास्टने या दोन इलेक्ट्रिक एसयूव्हींसाठी 21,000 रुपयांच्या टोकन किंमतीवर बुकिंगची प्रक्रिया आधीच सुरु केली आहे. त्यामुळे इच्छुक ग्राहक आताच या गाड्या बुक करु शकतात.
लॉन्च होण्याआधी या दोन्ही एसयूव्ही याच वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आल्या होत्या. त्यावेळी या गाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
व्हिनफास्ट VF7 चा डिझाइन खूप आकर्षक आहे. या एसयूव्हीच्या पुढील भागात V-आकाराचे खास DRLs (डेटाईम रनिंग लाईट्स) आहेत, जे तिला एक वेगळा लूक देतात. ही एसयूव्ही जेट ब्लॅक, डेसॅट सिल्व्हर, क्रिमसन रेडसह 6 कलरमध्ये उपलब्ध असेल.
व्हिनफास्ट VF7 ही 2WD आणि 4WD अशा दोन्ही पर्यायांमध्ये येईल. यात 70.8kWh ची दमदार बॅटरी पॅक आहे. 4WD मॉडेलमध्ये 350 hp ची पॉवर आणि 500 Nm टॉर्क मिळेल, तर 2WD मॉडेलमध्ये 204 hp पॉवर मिळेल. WLTP नुसार, याची रेंज 431 ते 450 किमी आहे.
व्हिनफास्ट VF6 चा डिझाइनही खूप आकर्षक आहे. यातही पुढील बाजूस एलईडी डेटाइम रनिंग लाइट्सची खास पट्टी आहे. ग्रिलमध्ये हनीकॉम्ब पॅटर्न असून, त्यामुळे ही कार खूप स्पोर्टी आणि दमदार दिसते.
या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 59.6 kWh ची बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे, जो 204 hp पॉवर देतो. WLTP नुसार, या गाडीची रेंज 480 किमी पर्यंत आहे.