गोमंतक ऑनलाईन टीम
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमांतक या काव्याची रचना केली होती.
गोव्याबाबतच्या या काव्याची पार्श्वभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळाची आहे. या काव्याचे आता कोकणी भाषेत गद्य रूपांतरण करण्यात आले आहे.
हे महाकाव्य 1730 नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे. यात पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार व हिंदूंनी दिलेला लढा यांचे वर्णन आहे.
अंदमानच्या कोठडीत तुरुंगवास भोगताना हाती कागद व पेन नसताना सावरकरांनी कमला आणि गोमांतक या काव्यांची निर्मिती केली होती.
दिवसभर कष्ट आणि रात्री अंधार कोठडीत कुशाग्र प्रतिभाशक्तीच्या आधारे सावरकरांनी वृत्त छंदात काव्याच्या पंक्ती रचल्या.
कोळशाने कारागृहाच्या भिंतीवर अंधूक उजेडात त्या लिहून काढल्या, मुखोद्गत केल्या, वॉर्डर येण्यापूर्वी त्या पुसून टाकल्या.
अकरा वर्षानंतर अंदमानातून सुटल्यावर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना सावरकरांनी हे काव्य कागदावर उतरवले.