Sameer Panditrao
कोकणातील देवगड तालुक्यात श्री देव विमलेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे.
साधारणत: पंधरा मीटर उंच व शंभर मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेले आहे.
मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. पटांगणातून सात-आठ पाय-या चढल्यावर या मंदिराचे पहिले प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक छोटासा चौक आहे.
पाय-या चढून गेल्यावर आपण गाभा-यात प्रवेश करतो. हा गाभारा म्हणजे दहा ते बारा फूट व्यास असलेली एक गुहा आहे.
गाभा-याच्या मध्यभागी भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे.
या मंदिराचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे, मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मंदिरात दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू असतात.