Sameer Panditrao
उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा प्रभाव पुन्हा वाढला असल्याने राज्यात किमान तापमानाचा पारा १८.१ अंशांवर गेला आहे.
सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत -२.५ अंशांनी घटले आहे.
यंदाच्या तापमानातील हे दुसरे नीचांकी तापमान आहे. यंदा १२ डिसेंबर रोजी सर्वात कमी म्हणजे १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.
गोव्यातील सर्वात कमी तापमान कधी नोंदवले गेले होते?
आकडेवारीनुसार, आतापर्यंत १२ डिसेंबर १९८१ साली सर्वांत कमी म्हणजेच १५.७ अंश सेल्सिअसवर किमान पारा गेला होता.
अनेकदा डिसेंबरमध्ये तापमानात १६, १७ अंशांवर गेले आहे.
राज्यात किमान ६१ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत -१३ वर पोहोचली होती.