Arjun Tendulkar: हमारा 'अर्जुन' किसीसे कम ना वे! गोव्याच्या विजयाचा ठरला शिल्पकार

Manish Jadhav

विजय हजारे ट्रॉफी

गोव्याच्या संघाने विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये विजयाने सुरुवात केली.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

अर्जुनचा वार

गोव्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ओडिशाचा पराभव केला. जयपूरच्या डॉ. सोनी स्टेडियमवर उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरने अप्रतिम कामगिरी केली. अर्जुनने गोव्याच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

दमदार खेळी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान अर्जुन टूर्नामेंटच्या मध्यात संघाबाहेर होता, त्याची कामगिरी देखील विशेष नव्हती. मात्र विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने दमदार खेळी केली आहे.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

यशस्वी गोलंदाज

ओडिशाविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी लक्ष्याचा बचाव करताना तो आपल्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

किफायतशीर गोलंदाजी

गोव्यासाठी अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीची सुरुवात केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये तो खूपच किफायतशीर ठरला.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

विकेट्स

एकामागून एक ओडिशाच्या 3 फलंदाजांना अर्जुनने टिपले. अर्जुनने 10 षटकात 6.10 च्या इकॉनॉमी रेटने 61 धावा देत 3 विकेट्स घेतल्या त्याने कार्तिक बिस्वाल, अभिषेक राऊत आणि राजेश मोहंती यांना आपले बळी बनवले.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak
आणखी बघा