Manish Jadhav
देशांतर्गत सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत नवे विक्रम मोडले आणि रचले जात आहेत.
बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात एका विक्रमाची नोंद केली. यापूर्वी, अली अकबरच्या नावावर असलेला विक्रम वैभवने मोडला.
भारतासाठी लिस्ट ए स्पर्धेत खेळणारा वैभव हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीत बिहारकडून मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळत हा विक्रम नोंदवला.
वैभव मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळला तेव्हा 13 वर्षे 269 वर्षांचा होता. यासह त्याने अली अकरबरचा विक्रम मोडला.
वैभव नुकताच अंडर 19 आशिया कप स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत त्याने आपल्या कामगिरीची छाप सोडली.
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आयपीएल मेगा लिलावात चांगला भाव मिळाला. राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलं.