Manish Jadhav
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच साराने ऑस्ट्रेलियातील व्हेकेशन फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
साराने ऑस्ट्रेलियातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्या-केल्या अवघ्या 30 मिनिटात तब्बल अडीच लाख यूजर्संनी लाईक केले. यूजर्संनी लाईकचा धडाका लावला.
सारा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध अशा ‘लिझार्ड आयलंड’वर एन्जॉय करताना फोटोंमध्ये दिसत आहे. साराचा किलर लूक मोहिनी घालत आहे. यावेळी तिनं हिरव्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
साराने आपल्या खास अंदाजातील क्रिएटिव्हीटीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
या फोटोमध्ये साराचे मेकअप किटमधील काही वस्तू आयलंडच्या वाळूवर पडलेल्या दिसतायेत.
साराचा हटके अंदाज चाहत्यांना भावतोय. या फोटोमध्ये तिने डोक्यावर हॅट ठेवत आणि डोळ्यांना सनग्लासेस लावत फोटो काढला आहे.