Manish Jadhav
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या 'साम्राज्य चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या अॅक्शनने भरलेल्या चित्रपटात विजय त्याच्या साम्राज्याचे रक्षण करताना दिसत आहे.
विजय देवरकोंडाच्या या आगामी चित्रपटाचा बुधवारी (12 जानेवारी) टीझर रिलीज करण्यात आला. 1 मिनिट 52 सेकंदाच्या या टीझरमध्ये मृतदेहांचे ढीग आणि तलवारींचा खनखनाट ऐकू येतो.
टीझरमध्ये सर्वत्र रक्त दिसून येत आहे. युद्ध अजूनही चालू आहे. एक असे युद्ध ज्याचा अंत दिसत नाही. हा टीझर चाहत्यांच्या चांगलाचं पसंतीस उतरत आहे.
टीझरवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले की, हा एक शानदार टीझर आहे. यावेळी बॉक्स ऑफिसवर विजय देवरकोंडाच्या सामाज्याचा दबदबा पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, हा एक जबरदस्त टीझर आहे. विजय देवरकोंडा एक उत्तम अभिनेता असून मी त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, तो 30 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ज्युनियर एनटीआरने तेलुगु व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. सूर्याने चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. तर बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने मुख्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या व्यक्तिरेखेच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले असून निर्मिती नागा वामसी आणि साई सौजन्य यांनी केली आहे. याशिवाय, या चित्रपटाचे संगीत प्रसिद्ध दक्षिण दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. या चित्रपटाचे टायटल जरी किंगडम असले तरी हिंदीमध्ये त्याचे टायटल साम्राज्य आहे.