Konkan Hidden Gem: लाटांचा गुंजारव, चांदण्यांनी सजलेलं निळं आभाळ अन् चंद्राच्या कोरीसारखा रुपेरी किनारा; कोकणातल्या 'या' स्पॉटला नक्की भेट

Manish Jadhav

निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा

वेळणेश्वरचा किनारा अत्यंत स्वच्छ आणि नारळ-पोफळीच्या बागांनी वेढलेला आहे. इतर गजबजलेल्या किनाऱ्यांच्या तुलनेत येथे कमालीची शांतता अनुभवायला मिळते, ज्यामुळे 'रिलॅक्स' होण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

प्राचीन वेळणेश्वर शिव मंदिर

किनाऱ्यालगतच भगवान शंकराचे अतिशय सुंदर आणि जागृत मंदिर आहे. या मंदिरामुळेच या गावाला 'वेळणेश्वर' हे नाव पडले. धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटन यांचा येथे सुरेख मेळ बसतो.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

पोहण्यासाठी सुरक्षित समुद्र

वेळणेश्वरचा समुद्र किनारा अर्धवर्तुळाकार असून येथील पाणी तुलनेने संथ असते. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षितपणे पोहण्याचा आणि पाण्याचा आनंद घेता येतो.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

महाशिवरात्रीचा भव्य उत्सव

येथील मंदिरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण किनारा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

फोटोग्राफीसाठी 'व्हर्जिन' लोकेशन्स

जर तुम्हाला इन्स्टाग्रामसाठी 'एस्थेटिक' फोटो हवे असतील, तर वेळणेश्वर बेस्ट आहे. येथील पांढरी शुभ्र वाळू, काळे पाषाण आणि निळे पाणी यामुळे कोणतंही फिल्टर न वापरता फोटो 'पिक्चर परफेक्ट' येतात.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

स्कूबा डायव्हिंग

वेळणेश्वर आणि जवळच असलेल्या परिसरामध्ये आता स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सला चालना मिळत आहे. येथील पाणी स्वच्छ असल्याने समुद्राखालील रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहता येतात.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

रात्रीचा 'मिल्की वे' नजारा

शहरातील प्रकाशाच्या प्रदूषणापासून लांब असल्याने, रात्रीच्या वेळी वेळणेश्वरच्या किनाऱ्यावरुन आकाश अगदी स्वच्छ दिसते. समुद्राच्या गाजासोबत चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहणं हा एक 'मेडिटेटिव्ह' अनुभव आहे.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

शांतीचा शोध घेणाऱ्यांसाठी 'रिट्रीट'

जर तुम्हाला 'डिजिटल डिटॉक्स' हवा असेल, तर हे योग्य ठिकाण आहे. मोबाईल नेटवर्कच्या कटकटीपासून लांब, केवळ लाटांचा आवाज आणि पक्षांचे किलबिलाट ऐकत स्वतःला शोधण्यासाठी वेळणेश्वरला नक्की भेट द्यावी.

Velneshwar Beach | Dainik Gomantak

अभेद्य चढण, मृत्यूला आव्हान देणारी उंची अन् सह्याद्रीच्या मस्तकावरील स्वराज्याचा अणकुचीदार बाण; 400 वर्षांच्या शिवशाहीचा साक्षी 'तुंग किल्ला'

आणखी बघा