Akshata Chhatre
पतीच्या दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी विवाहित स्त्रिया करत असलेल्या या व्रताचा भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनमोल आहे. या दिवशी आपल्या पत्नीला खास वाटण्यासारखी भेट द्या.
लाडक्या पत्नीसाठी एक टिकाऊ आणि खास भेट छोटसं सोन्याचं कर्णफूल, ब्रेसलेट किंवा चांदीची पैंजण तिच्या चेहऱ्यावर आनंद आणतील.
पैठणी, बनारसी किंवा कांजीवरमसारखी साडी सणाच्या दिवशी तिच्या सौंदर्यात भर घालणारी पारंपरिक भेट.
सणासुदीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला सजायला आवडतं. चांगल्या क्वालिटीचा मेकअप किट किंवा पारंपरिक शृंगार वस्तूंचं सेट द्या.
उपवास आणि घरकामाच्या दिवसात विश्रांतीचं भेटवस्तू देणं म्हणजे काळजी व्यक्त करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग.
व्रताच्या दिवशी उपयोगी ठरणारा आकर्षक पूजा थाळी सेट तिला तिच्या पूजेमध्ये विशेष आनंद देईल.