Manish Jadhav
घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ, उजेडलेले आणि अडथळेमुक्त ठेवा. दारासमोर कचरा किंवा जुन्या वस्तू साठवू नका; यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि चिडचिड कमी होते.
घराची ईशान्य दिशा जड वस्तू किंवा अडगळीने भरुन ठेवू नका. ही दिशा स्वच्छ व हलकी ठेवल्यास मनाला शांतता मिळते आणि कुटुंबातील संवाद सुधारतो.
बेडरुममध्ये किंवा पलंगासमोर आरसा लावणे टाळा. चुकीच्या ठिकाणी आरसा असल्यास अनावश्यक तणाव, गैरसमज आणि वादाची शक्यता वाढू शकते.
झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे. यामुळे गाढ आणि शांत झोप लागते, ज्याचा थेट परिणाम दिवसाच्या स्वभाव आणि वागण्यावर होतो.
स्वयंपाकघर स्वच्छ व हवेशीर ठेवा. स्वयंपाक करताना तणाव किंवा राग धरु नका; अन्नातूनही घरातील वातावरण घडत असते.
कुटुंबातील सदस्यांनी एकत्र गप्पा मारता येतील अशी हॉलमधील रचना करा. टीव्ही किंवा मोबाईलपेक्षा थेट संवादातून नात्यांतील दुरावा आणि वाद कमी होतात.
घरात तुळशीसारखे किंवा इनडोअर रोपे ठेवा आणि संध्याकाळी घरात सौम्य व उबदार प्रकाश ठेवा. यामुळे घरातील वातावरण शांत व प्रसन्न राहते.