Manish Jadhav
घराचा मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते. दरवाजासमोर खांब, मोठे झाड किंवा कचराकुंडी नसावी, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा येत नाही.
स्वयंपाकघर आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला असणे उत्तम ठरते. तसेच स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे राहील अशी रचना असल्यास घरातील आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते.
मुख्य बेडरुम नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला असावी. झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला राहील अशी बेडची रचना करावी, यामुळे शांत झोप लागते आणि मानसिक ताण कमी होतो.
घरातील देवघर नेहमी ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला असावे. पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे राहील याची काळजी घ्यावी. देवघर बाथरुमच्या भिंतीला लागून नसावे.
शौचालय आणि बाथरुम वायव्य (उत्तर-पश्चिम) किंवा पश्चिम दिशेला असणे योग्य मानले जाते. ईशान्य दिशेला बाथरुम असल्यास घरात आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
घरात पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा येण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशेला खिडक्या असणे गरजेचे आहे. बंदिस्त आणि अंधाऱ्या घरामुळे घरात नकारात्मकता आणि आळस वाढू शकतो.
जमिनीखालील पाण्याची टाकी किंवा बोअरवेल ईशान्य दिशेला असावी, तर छतावरील टाकी नैऋत्य दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. तसेच घरातील कोणत्याही नळातून पाणी गळणार नाही याची खात्री करा.