Manish Jadhav
फुले आणि फळांच्या झाडांना दररोज किमान 5 ते 6 तास थेट ऊन मिळणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाश कमी पडल्यास झाडांना कळ्या किंवा फळे कमी येतात.
झाडांची मुळे सहज पसरण्यासाठी माती भुसभुशीत ठेवा. मातीत शेणखत, गांडूळखत आणि थोडी वाळू मिसळल्यास झाडांना चांगले पोषण मिळते.
झाडांना रोज थोडे पाणी द्या, पण कुंडीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. जास्त पाणी साचल्यास मुळे सडण्याची शक्यता असते.
फुले आणि फळे चांगली येण्यासाठी केळीच्या सालींचे खत, बोनमील किंवा सेंद्रिय खते द्या. यामुळे कळ्या गळण्याचे प्रमाण कमी होते.
कोमेजलेली फुले आणि वाळलेल्या फांद्या वेळोवेळी कापून टाका. यामुळे झाडाची ताकद वाया न जाता नवीन कळ्या व फळे येण्यास मदत होते.
कळ्या आणि पानांवर मावा किंवा इतर कीड दिसल्यास कडुलिंबाच्या तेलाची (Neem Oil) फवारणी करा. कीड वेळीच आटोक्यात आणल्यास फळांची वाढ चांगली होते.
फुलांचे फळात रुपांतर होण्यासाठी मधमाश्या आणि फुलपाखरे बागेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडे लावा आणि गरज पडल्यास हलक्या हाताने परागीभवन करा.
Bhuikot Fort: मराठ्यांच्या लष्करी रणनीतीचा साक्षीदार, 300 वर्षांचा इतिहास सांगणारा भुईकोट किल्ला; इंद्रायणीच्या तीरावरील ऐतिहासिक ठेवा