Manish Jadhav
घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा पाण्यात खडे मीठ टाकून घर पुसून घ्यावे. यामुळे घरातील वास्तू दोष दूर होऊन सकारात्मकता वाढते.
बाथरुम किंवा शौचालयातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरुन ते कोपऱ्यात ठेवावे. हे मीठ दर आठवड्याला बदलत राहावे.
वास्तूनुसार मुख्य दरवाजावर नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी एका लाल रंगाच्या कपड्यात खडे मीठ बांधून ते दरवाजावर बांधले जाते, ज्यामुळे वाईट नजर घरापासून दूर राहते.
घरातील ज्या खोलीत सतत वाद किंवा ताणतणाव असतो, तिथे एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि खडे मीठ मिसळून ठेवावे. हे पाणी दर काही दिवसांनी बदलल्याने घरातील वातावरण शांत होण्यास मदत होते.
वैयक्तिक ताणतणाव किंवा सततची मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी खड्या मिठाचा छोटा तुकडा खिशात किंवा पर्समध्ये ठेवणे फायदेशीर ठरते, असे वास्तुशास्त्रात मानले जाते.
स्वयंपाकघरात मीठ नेहमी काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत ठेवावे. मीठ कधीही लोखंडी किंवा प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नये, कारण यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही मीठ दान करु नये किंवा उधारीवर देऊ नये. तसेच संध्याकाळच्या वेळी घरात मीठ सांडणे अशुभ मानले जाते.