Sameer Amunekar
वसई किल्ल्याचा इतिहास तब्बल सहा शतकांपूर्वीचा आहे.
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला किल्ला बहादूरशाहच्या ताब्यात होता.
किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता, तर सागरी व्यापार आणि जहाजबांधणी केंद्र म्हणूनही ओळखला जायचा.
१५३० च्या दशकात पोर्तुगीजांनी लढून हा किल्ला जिंकला.
त्यांनी भव्य चर्च, वसाहती, व्यापारी बाजारपेठा आणि प्रशासकीय इमारती बांधल्या.
१७३९ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ला जिंकला.
१९व्या शतकात इंग्रजांनी किल्ल्याची सूत्रे आपल्या हाती घेतली; आजही भिंतींवरील भग्नावशेष इतिहासाची आठवण देतात.
'सिंहगड किल्ला' नैसर्गिक सौंदर्य आणि गौरवशाली इतिहास जिथे एकत्र येतो