Sameer Amunekar
सिंहगड गाव मार्ग (२.७ किमी, मध्यम कठीण) आणि कल्याण दरवाजा मार्ग (अधिक कठीण व रोमांचक).
वाहनाने जायला वळणदार रस्ता असल्यामुळे सर्व वयोगटातील पर्यटकांना सहज प्रवेश.
तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, लोकमान्य टिळकांचा वाडा आणि प्राचीन मंदिरे किल्ल्याला विशेष ठरवतात.
वर पोहोचल्यावर दिसणारे डोंगररांगा, तटबंदी आणि थंड वाऱ्यांची झुळूक मन मोहून टाकतात.
प्रत्येक दगड, बुरुज आणि बालेकिल्ला इतिहासाची जिवंत साक्ष देतो.
पिठलं-भाकरी, झुणका-भाकर, पावसाळ्यातील कांदा भजी आणि ताकाचा ताजेपणा अनुभवायला मिळतो.
साहस, इतिहास आणि स्वाद यांचे अनोखे मिश्रण सिंहगड किल्ल्याच्या प्रवासाला अविस्मरणीय बनवते.