बाजीराव पेशव्याची निती अन् रणधुरंधर 'चिमाजी अप्पा'चं शौर्य, 'वसई'च्या छाताडावर फडकला मराठ्यांचा भगवा; सफर थरारक इतिहासाची

Manish Jadhav

वसई किल्ला

पालघर जिल्ह्यातील वसई येथे असलेला हा किल्ला 'किल्ले वसई' किंवा 'कोर्ट बासेन' म्हणून ओळखला जातो. हा किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा आणि वास्तुकलेचा एक अद्भूत नमुना आहे.

Vasai Fort | Dainik Gomantak

पोर्तुगीजांचे मुख्य केंद्र

इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी सुलतान बहादूर शाहकडून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर अनेक वर्षे हे पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातील मुख्य प्रशासकीय आणि लष्करी केंद्र होते.

Vasai Fort | Dainik Gomantak

'चिमणाजी अप्पा' पराक्रम

इ.स. 1739 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू 'चिमणाजी अप्पा' यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून या किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला. हा मराठा इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे.

Vasai Fort | Dainik Gomantak

110 एकर परिसरात किल्ला

हा किल्ला तब्बल 110 एकर परिसरात पसरलेला असून याला मजबूत तटबंदी आणि भव्य बुरुज आहेत. किल्ल्याला 'लांडगा बुरुज' आणि 'उदक बुरुज' असे महत्त्वाचे बुरुज संरक्षण देत असत.

Vasai Fort | Dainik Gomantak

युरोपियन वास्तुकलेचा संगम!

किल्ल्याच्या आत पोर्तुगीज शैलीतील भव्य चर्च, कॅथेड्रल, न्यायालय, आणि शासकीय इमारतींचे अवशेष आजही पाहायला मिळतात. ही वास्तुकला पर्यटकांना युरोपची अनुभूती देते.

Vasai Fort | Dainik Gomantak

बॉलिवूडचे आवडते शूटिंग स्पॉट!

वसई किल्ला हा बॉलिवूड दिग्दर्शकांचा अत्यंत आवडता किल्ला आहे. 'खामोशी' चित्रपटातील गाणी असोत किंवा जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' (Coldplay) बँडचे 'हायमन फॉर द वीकेंड' गाणे, याचे शूटिंग याच किल्ल्यात झाले.

Vasai Fort | Dainik Gomantak

निसर्ग आणि पर्यटनाचा आनंद

एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवळ यामुळे हा किल्ला फोटोग्राफी आणि प्री-वेडिंग शूटसाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिकच खुलते.

Vasai Fort | Dainik Gomantak

कसे पोहोचायचे?

मुंबईपासून जवळ असलेल्या वसई रोड रेल्वे स्थानकावर उतरुन तिथून बस किंवा ऑटोने तुम्ही अगदी सहज वसई किल्ल्याला भेट देऊ शकता. इतिहासप्रेमींसाठी ही एक उत्तम वन-डे ट्रिप आहे.

Vasai Fort | Dainik Gomantak

Purnagad Fort: कोकणातील कान्होजी आंग्रेंचं स्वप्न अन् स्वराज्याचा पहारेकरी; वाचा समुद्राशी भिडणाऱ्या 'पूर्णगड'ची थरारक शौर्यगाथा

आणखी बघा