Varun Chakravarthy: विजय हजारे ट्रॉफीत वरुणचा दुसऱ्यांदा 'पंजा'; अर्शदीपला टाकले मागे

Manish Jadhav

वरुण चक्रवर्ती

विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिळनाडूकडून खेळताना वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak

वरुणचा जलवा

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak

पाच विकेट्स

गुरुवारी (9 जानेवारी) वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर राजस्थानविरुद्धच्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात तमिळनाडूकडून खेळताना वरुणने पाच विकेट्स घेतल्या आणि बॅटने धावाही केल्या.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak

भूमिका

राजस्थानला 267 धावांवर रोखण्यात वरुण चक्रवर्तीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अभिजीत तोमर आणि महिपाल यांच्यातील 160 धावांची भागीदारी मोडली.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak

सर्वाधिक विकेट्स

विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 6 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak

पुनरागमन

तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2024 मध्ये वरुण चक्रवर्तीने भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यात 12 विकेट्स घेतल्या.

Varun Chakravarthy | Dainik Gomantak
आणखी बघा