Manish Jadhav
पोकोची नवीन X7 सीरीज मिड रेंजच्या सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजमध्ये, तुमच्यासाठी Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G लॉन्च करण्यात आले आहेत.
पोको ब्रँडचे हे दोन्ही मिड-रेंज स्मार्टफोन कोणत्या फिचर्ससह लॉन्च करण्यात आले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध आहेत.
डिस्प्ले: पोको एक्स7 मध्ये 6.67 इंचाची एमोलेड स्क्रीन आहे, ज्यामध्ये 3डी कर्व्हड डिस्प्ले आहे, जो 3000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
बॅटरी क्षमता: 5500 एमएएच बॅटरी 45 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे, कंपनीचा दावा आहे की, हा फोन 47 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होतो.
Poco X7 Pro 5G फोनचे दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत, 8 GB RAM / 256 GB स्टोरेज आणि 12 GB RAM / 256 GB स्टोरेज. 8 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आणि 12 जीबी व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
डिस्प्ले: या प्रो व्हेरिएंटमध्ये 6.73 इंचाची AMOLED स्क्रीन आहे, जी 3200 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह आहे.
प्रोसेसर: पोकोने X7 सीरीजमध्ये लॉन्च केलेल्या प्रो व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर वापरला आहे.
कॅमेरा सेटअप: 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT-600 कॅमेरा सेन्सर असेल, तसेच, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 20 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 90 वॅट हायपरचार्ज सपोर्टसह 6550 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.