Manish Jadhav
वर्काला बीच हा दक्षिण केरळमधील सर्वात सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. निळेभोर पाणी आणि सोनेरी वाळू पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
या बीचचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्राला लागून असलेले उंच 'क्लिफ्स' (खडक). भारतातील इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारचे खडकाळ सौंदर्य पाहायला मिळत नाही.
वर्काला बीचला 'पापनाशम बीच' असेही म्हणतात. असे मानले जाते की, येथील पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात. या किनाऱ्याला धार्मिक महत्त्वही आहे.
वर्काला क्लिफवरुन दिसणारा सूर्यास्त हा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. संध्याकाळच्या वेळी आकाशात उमटणारे विविध रंग पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
जर तुम्हाला साहसाची आवड असेल, तर येथे तुम्ही सर्फिंग (Surfing), पॅरासेलिंग आणि कयाकिंगचा आनंद घेऊ शकता. सर्फिंगसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.
किनाऱ्याजवळच भगवान विष्णूंचे 2000 वर्षे जुने 'जनार्दन स्वामी मंदिर' आहे. हे मंदिर केरळच्या पारंपारिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे.
वर्काला हे ठिकाण आयुर्वेदिक उपचार आणि योगा केंद्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथील क्लिफवर अनेक सेंटर्स आहेत, जिथे तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ शकता.
वर्काला क्लिफवर ओळीने अनेक छान कॅफे, सी-फूड रेस्टॉरंट्स आणि हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने आहेत. रात्रीच्या वेळी येथील वातावरण अतिशय उत्साहवर्धक असते.