तुमच्या स्वप्नातले जग सापडेल गोव्यातल्या 'या' ठिकाणी! मग कधी भेट देताय?

गोमन्तक डिजिटल टीम

विविधरंगी गोवा

विविधतेने नटलेल्या गोव्यात पर्यटनासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अशाच एका मोहक ठिकाणाशी आज ओळख करून घेऊयात.

Goa

व्हँक्सिम बेट

गोव्याच्या गजबजलेल्या भागापासून दूर हे बेट तुम्हाला विलक्षण शांतता मिळवून देते.

Vanxim Island

नैसर्गिक सुंदरता

इथे लोकांची फार गर्दी होत नसल्याने व्हँक्सिम बेट आपली नैसर्गिक सुंदरता टिकवून आहे.

Vanxim Island

कमी लोकसंख्या

अत्यंत मर्यदित लोकसंख्या असल्यामुळे पर्यटक इथे पायी भटकणे अथवा सायकलने फिरण्याचा आनंद घेतात.

Vanxim Island

सर्वात लहान बेट

मांडवीच्या प्रवाहातील सहा प्रमुख बेटांमधील हे सगळ्यात लहान बेट मानले जाते.

Vanxim Island

सेंटो क्रिस्टोचे चर्च

1879 मध्ये बांधलेले चर्च ऑफ सँटो क्रिस्टो म्हणून ओळखले जाणारे चर्च देखील या भागात तुम्हाला पाहता येते.

Church of Santo Cristo

चमत्कारिक क्रॉसचे चॅपल

व्हँक्सिममधील एक महत्त्वाची खूण म्हणजे क्रॉसचे चॅपल. राज्यभरातून बरेच लोक येथे नवस करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी येतात.

Chapel of the Miraculous Cross

नदी क्रूसीफिक्स

हे ठिकाण व्हँक्सिम बेटाची ओळख आहे. गावकऱ्यांनी हा क्रॉस डॉक्टर लुई कॅब्रालच्या स्मरणार्थ बांधलेला आहे.

River Crucifix
Goa Trip
बाईकवरुन करा 'ऑफबीट गोव्याची' सफर