बाईकवरुन करा 'ऑफबीट गोव्याची' सफर

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा बाईक टूर

गोव्याची बाईक टूर करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोव्याचा अवर्णनीय आनंद जवळून घ्यायचा असेल तर नक्कीच ही टूर महत्वाची आहे.

निसर्गाशी कनेक्ट

गोव्यातील किनारे, जंगल भाग, हिरवीगार पठारे, अवघड रस्त्यांवरुन फेरफटका मारताना आपण जणू निसर्गाशी एकरूप होतो.

संस्कृतींचा अनुभव

गोवा राज्यात विविध संस्कृती नांदत असल्यामुळे इथली विविधता पाहण्याची ही एक चांगली संधी आहे.

हिरवेगार रस्ते

गोव्यातले हिरवेगार लॅन्डस्केप, इथल्या भातशेती भोवतीने बाईकने फिरणे हा नक्कीच तुम्हाला आनंद देणारा अनुभव आहे.

खाद्यभ्रमंती

गोव्यातले स्थानिक पदार्थ चाखण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही तुमची बाईक कोणत्याही छोटयाश्या गल्लीत नेऊन इथल्या गोवन पदार्थांवर ताव मारू शकता.

फेस्टिव्हल/कार्निव्हल

गोव्यात वेगवेगळे सण, उत्सव साजरे होत असतात. तुम्ही ती वेळ पकडून तुमची रोड ट्रिप प्लॅन केलीत तर तुम्हाला वेगळा अनुभव घेता येईल.

प्रार्थनास्थळांची सफर

विविध संस्कृती नांदत असल्यामुळे इथे पुरातन आणि गोवन कलाकुसरीने नटलेली अनेक प्रार्थनास्थळे आहेत. या ठिकाणी जाऊन तुम्ही हा दौरा अविस्मरणीय करू शकता.

'बंगळुरू ते गोवा' एक अद्भुत सफर

आणखी पाहा