Sameer Panditrao
मुंबई गोवा महामार्गाजवळ लपलं आहे एक अद्भुत ठिकाण. कोणतं ते जाणून घेऊ.
जयगडनजीक नांदिवडे गावाजवळ असलेले कऱ्हाटेश्वर मंदिर हे कोकणातील प्राचीन शिवमंदिरापैकी एक आहे.
या शिलाहारकालीन मंदिरापासून समुद्राचा डोळे भरून टाकणारा नजारा पाहायला मिळतो.
मंदिर, गर्भगृह आणि आसपासचा परिसर शांत आणि पाहण्यासारखा आहे.
बाजूला गोमुखातून वाहणारा गोड्या पाण्याचा झरा दृष्टीस पडतो.
मंदिराच्या पूर्वेला जयगड किल्ला आणि शास्त्री नदीच्या मुखाचा परिसर दिसतो.
नांदिवडे गावात कऱ्हाटेश्वर मंदिराशिवाय जोगेश्वरी, चंडिका, लक्ष्मीनारायण अशी आणखी मंदिरे आहेत.
या परिसरात रीळ, उंडी, अंबुवाडी, कचरे अशा अनेक सुंदर किनारे आहेत आणि थोडं पुढे गेलं की मालगुंड आणि गणपतीपुळे.