Manish Jadhav
आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 चा थरार सध्या रंगला आहे. एका महिला गोलंदाजाने आपल्या पदार्पण सामन्यात अशी कामगिरी करुन दाखवली, जी आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला करता आली नाही.
मध्य प्रदेशच्या वैष्णवी शर्माने पदार्पण सामन्यातच आपला जलवा दाखवून दिला. तिने आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघांच्या फलंदाजांना घायगुतीला आणले.
डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माची चमक मलेशियाविरुद्धच्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक सामन्यात पाहायला मिळाली.
या सामन्यात तिने 4 षटके गोलंदाजी केली आणि फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान तिने आपली हॅटट्रिकही पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीयच नाही तर तिने जगातील काही निवडक गोलंदाजांच्या लिस्टमध्ये स्थान मिळवले.
वैष्णवी आता भारताची शान बनली आहे. आयसीसी स्पर्धेसाठी जेव्हा तिची भारतीय संघात निवड झाली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात हॅटट्रिकसह 5 विकेट्स घेऊन वैष्णवीने तिची नवी ओळख निर्माण केली. याआधीही तिने देशांतर्गत पातळीवर घवघवीत यश मिळवले.