Manish Jadhav
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी म्हणजेच सोमवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रमुख नेते आणि प्रसिद्ध व्यक्ती वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. याआधी अमेरिकेत एका खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनीही या शाही डिनरला हजेरी लावली. ते डोनाल्ड ट्रम्प यांनाही भेटले.
यावेळी नीता अंबानी यांनी खूप सुंदर साडी परिधान केली होती. त्या नेहमीच त्यांच्या पारंपारिक लूकने उपस्थितांची मने जिंकतात. यावेळी त्यांनी ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती.
नीता अंबानी यांनी पारंपारिक कांचीपुरम सिल्क साडी परिधान केली होती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी. कृष्णमूर्तींनी विणलेल्या या साडीत नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या. तर मखमली ब्लाउज प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे.
नीता अंबानी यांनी 200 वर्ष जुन्या सुंदर ब्यूटीफुल पेंडेंटने आपला लूक पूर्ण केला.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्रम्प यांचे सर्वात जवळचे व्यक्ती एलन मस्क, अॅपलचे सीईओ टिम कुक, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. शपथविधी सोहळा रात्री 10:30 वाजता सुरु होईल. ज्यामध्ये जगभरातील प्रतिष्ठित लोक सहभागी होण्यासाठी येत आहेत.