Manish Jadhav
अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी भारत आणि यूएसए आमनेसामने आले. संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय युवा संघाचा 'स्टार' फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे लागले होते.
भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ भारतीय माऱ्यासमोर टिकू शकला नाही आणि अवघ्या 107 धावांत गारद झाला.
108 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला. चाहत्यांना त्याच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा होती, मात्र मोठ्या खेळीसाठी सर्वांना थोडी प्रतीक्षा करावी लागली.
वैभव सूर्यवंशीसाठी हा दिवस बॅटने फारसा चांगला ठरला नाही. आक्रमक शॉट मारण्याच्या नादात वैभव केवळ 2 धावा काढून बाद झाला. स्वस्तात बाद झाल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.
बॅटने अपयश आले तरी मैदानात पाऊल टाकताच वैभवने इतिहास रचला. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात खेळणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
ज्या दिवशी वैभव हा सामना खेळायला उतरला, तेव्हा त्याचे वय अवघे 14 वर्षे 294 दिवस इतके होते. क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी एकाही खेळाडूने 15 वर्षांच्या आत विश्वचषक खेळलेला नाही.
वैभवने कॅनडाच्या नितीश कुमारचा विक्रम मोडला. नितीशने 15 वर्षे 245 दिवसांच्या वयात पदार्पण केले होते. आता सर्वांना अपेक्षा आहे की, पुढच्या सामन्यात वैभव आपल्या बॅटनेही धमाका करेल.