Manish Jadhav
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात विंध्य पर्वतरांगांमध्ये स्थित मांडू किल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असून तो अफगाण स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.
हा किल्ला सुलतान बाझ बहादूर आणि त्यांची राणी रुपमती यांच्या अमर प्रेमगाथेसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यातील प्रत्येक वास्तू या प्रेमाची साक्ष देते.
किल्ल्याच्या उंचावर असलेले 'रुपमती पॅव्हेलियन' पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. येथून खालून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे आणि संपूर्ण निमार खोऱ्याचे विलोभनीय दृश्य दिसते.
दोन तलावांच्या (कापूर आणि मुंज तलाव) मध्ये बांधलेला हा महाल दुरुन पाहिल्यास पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजासारखा दिसतो, म्हणूनच याला 'जहाज महाल' म्हणतात.
मांडू येथील 'होशंग शाहचा मकबरा' हा भारतातील संगमरवरामध्ये बांधलेला पहिला मकबरा आहे. असे म्हटले जाते की, ताजमहाल बांधण्यासाठी याच वास्तूवरुन प्रेरणा घेण्यात आली होती.
या महालाच्या भिंती 77 अंशात झुकलेल्या आहेत, ज्यामुळे हा महाल एखाद्या झुलत्या पाळण्यासारखा (Swing) वाटतो. म्हणूनच याला 'हिंडोला महाल' असे नाव पडले आहे.
हा किल्ला 45 किलोमीटर लांबीच्या तटबंदीने वेढलेला आहे. यामध्ये एकूण 12 प्रवेशद्वारे आहेत, ज्यातील 'दिल्ली दरवाजा' हा मुख्य आणि सर्वात प्रेक्षणीय प्रवेशद्वार मानला जातो.
पावसाळ्यात मांडूचे सौंदर्य अधिकच खुलते. डोंगरदऱ्यांतून वाहणारे धबधबे आणि हिरवळ यामुळे याला 'सिटी ऑफ जॉय' (City of Joy) असेही म्हटले जाते.