Sameer Amunekar
आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकत वैभव सूर्यवंशीनं अनेक विक्रम रचले.
१४ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला त्याच्या कामगिरीबद्धल बक्षीस देण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे.
बिहार सरकारने वैभवला १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.
वैभव सूर्यवंशीने टी-२० मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
तसंच आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला.
वैभवने अवघ्या 35 चेंडूत हे शतक केलं. वैभवने यासह यूसुफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला. यूसुफ पठाण याने 37 चेंडूत शतक झळकावलं होतं.